शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्या झाला सैराट; आठवड्यातील चौथा हल्ला, तिसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:05 PM

जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे.

ठळक मुद्देनागरिक हादरलेबंदोबस्ताचे पिंजरे अद्याप रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील अर्जुनी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याचे शुक्रवारी दुपारी आढळून आले आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात या आठवडाभरात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. बिबट्याने एका आठवड्यात निरपराध नागरिकांवर केलेला हा चौथा हल्ला आहे.निर्मला श्रीरामे (५०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.येथील भानुसखिंडी शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक बिबट्याने तिला मागून पकडले व ठार केले.याआधी वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी विजय झाडे हे शुक्रवारी सकाळी शेतातून घरी परत जात असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. झाडे आपल्या शेतात रात्री जागलीसाठी गेले होते. सकाळी परत येत असताना झुडुपात दडलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. आपल्यावरील हल्ला कसाबसा परतवून लावत झाडे यांनी गावाकडे धाव घेतली. ही घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आहे.रामदेगी येथे बिबट्याने सलग दोन दिवस दोन व्यक्तींचा बळी घेतला होता. यात बफर क्षेत्रात खेळण्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका युवकाला बिबट्याने ठार केले होते तर एका बुद्ध विहारात वास्तव्याला आलेल्या भन्तेजींचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या बिबट्याला पकडण्याची वनविभागाकडे नागरिकांनी मागणी केली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. मात्र तो त्यात अद्याप अडकलेला नाही. बिबट्याची दहशत या परिसरातील नागरिकांच्या मनावर जबरदस्त बसली आहे. त्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्या