चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली येथील घरात बिबट्याने मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:10 IST2020-08-21T11:09:03+5:302020-08-21T11:10:05+5:30

नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडले आहे. या प्रकाराने बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वन विभागाची चमू गावात दाखल झाली आहे.

Leopard entered In the house at Devpayali in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली येथील घरात बिबट्याने मांडले ठाण

चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली येथील घरात बिबट्याने मांडले ठाण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडले आहे. या प्रकाराने बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वन विभागाची चमू गावात दाखल झाली आहे.
शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान या बिबट्याने गावात प्रवेश केला. प्रवेश केल्या केल्याच संदीप मडावी यांच्या यांच्या घराच्या आवारात प्रवेश करून कोंबड्यावर ताव मारला. यानंतर आरडाओरडा होताच त्याने तेथून धूम ठोकली व बाजूलाच असलेल्या शौचालयात ठाण मांडले. या दरम्यान रस्त्यावर उभे असलेल्या स्वप्नील रामदास मासूरकर (२८) या तरूणाला पायावर झडप मारून जखमी केले.
दरम्यान वन विभागाला ही माहिती देण्यात आली.तळोधी वनपरिक्षेत्राचे अधिकारी गावात दाखल झाले असून बिबट्यास पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Web Title: Leopard entered In the house at Devpayali in Chandrapur district