दिघोरी उपवनात बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: August 3, 2014 00:02 IST2014-08-03T00:02:12+5:302014-08-03T00:02:12+5:30
कोठारी वनपरिक्षेत्रातंर्गत दिघोरी संरक्षित वनात मागील १०-१५ दिवसापासून बिबट्याचा वावर असून रात्रीला गावामध्ये शिरकाव करून गोठ्यातील शेळ्यांवर ताव मारीत असल्याने येथील

दिघोरी उपवनात बिबट्याचा धुमाकूळ
घोसरी : कोठारी वनपरिक्षेत्रातंर्गत दिघोरी संरक्षित वनात मागील १०-१५ दिवसापासून बिबट्याचा वावर असून रात्रीला गावामध्ये शिरकाव करून गोठ्यातील शेळ्यांवर ताव मारीत असल्याने येथील नागरिकांमध्ये भितीयुक्त दहशत पसरलेली आहे.
पोंभूर्णा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ६ व्यक्तीचा बळी गेला. वन्यप्राणी - मानव संघर्ष धगधगत आहे. अशातच १०-१५ किमी अंतरावरील दिघोरी उपवनक्षेत्रात बिबट्याने धुमाकुळ सुरु केला आहे. जंगलातील वन्यप्राण्यांचा फााडशा पाडत रात्रीला गावामध्ये येत आहे. यामुळे नवेगाव मोरे - दिघोरी येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नुकताच दिघोरी येथील कमलाबाई नामदेव, व्याहाडकर यांच्या गोठ्यातील तीन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. जंगलालगतच्या नवेगाव मोरे, दिघोरी, चेकफुटाणा वासीयांनी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सद्य:स्थितीत शेती हंगामाची कामे सुरू आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे जंगलालगतच्या शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे. विशेषत: बिबट नरभक्षक नसला तरी जनावराना भक्ष्य करीत असल्याने नागरिक भितीने ग्रासले आहेत. क्षेत्रसहाय्यक गोंगले, वनरक्षक गोरे, मुलमुले यांनी जंगल परिसरात गस्त वाढवलेली असून बिबट्याचा गावातील शिरकाव रोखण्याकरिता मिरची धुरीणीचा प्रयोग अवलंबलेला आहे. (वार्ताहर)