एलसीबीची सात जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST2021-09-11T04:28:11+5:302021-09-11T04:28:11+5:30

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजार फोफावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे ...

LCB raids seven gambling dens | एलसीबीची सात जुगार अड्ड्यावर धाड

एलसीबीची सात जुगार अड्ड्यावर धाड

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजार फोफावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेगवगळे पथक तयार करुन जिल्ह्याभरात विशेष मोहीम राबवून सात ठिकाणी धाड टाकली. यावेळी माजरी येथे कारवाई करुन ३० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच जणांना अटक केली. तर चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनतंर्गत कारवाई करुन एकाला अटक करुन १६ हजार १५५ जणांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर वरोरा येथे ११ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक, सावली येथे ११ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक, भद्रावती येथे दोन ठिकाणी धाड टाकून दोघांना अटक करुन पाच हजार ८१०, कोरपना येथे धाड टाकून एक हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एकाला अटक तर मूल येथे एक हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पथकांनी केली.

Web Title: LCB raids seven gambling dens