वेकोलित कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:38+5:302021-03-17T04:29:38+5:30

: राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात ...

Launch of Vecolit Covishield vaccination | वेकोलित कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ

वेकोलित कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ

: राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक सब्यसाची डे यांना आज पहिली कोविशिल्ड लस सहाय्यक मेट्रन शशी मसीह यांनी दिली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटक क्षेत्रीय महाव्यवस्थापक सब्यसाची डे यांनी ही लस सुरक्षित तसेच मोफत दिली जात असून वेकोलिच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याचे आवाहन केले. क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी डॉ.ओवेस अली यांनी कोविडच्या लसीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली.

या शुभारंभ कार्यक्रमाला महाव्यवस्थापक ( संचालक ) सी.पी.सिंह, क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक समीर बारला,डॉ.चंद्रशेखर, डॉ.जगदीश, कढोली प्राथमिक स्वास्थ केंद्राचे डॉ.विपीन कुमार ओदेला आणि त्यांची संपूर्ण टीम, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य विवेक अल्लेवार, शिरपूरम रामलू, पी.बी.पाटील, रामचंद्र, मीडिया प्रभारी सूरज इत्यादी उपस्थित होते. संचालन मेट्रन शशी मसीह यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

Web Title: Launch of Vecolit Covishield vaccination