सावरगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:00 AM2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:19+5:30

या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचेे उद्घाटन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अमर मांढरे, तुळशीदास पर्वते, चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी, प्रभाकर पटवारी बोरकर, चंद्रशेखर मेश्राम, आदिवासी विकास मंडळाचे ग्रेडर उराडे, संस्था सचिव पी. एस. शेडमाके, लिपिक बबन लोणारे यांची उपस्थिती होती.

Launch of Paddy Procurement Center at Savargaon | सावरगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

सावरगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देकार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

  लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव :  नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शासकीय आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.  यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचेे उद्घाटन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अमर मांढरे, तुळशीदास पर्वते, चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी, प्रभाकर पटवारी बोरकर, चंद्रशेखर मेश्राम, आदिवासी विकास मंडळाचे ग्रेडर उराडे, संस्था सचिव पी. एस. शेडमाके, लिपिक बबन लोणारे यांची उपस्थिती होती. यावर्षी कोरोना महामारीच्या अकाली संकटामुळे आर्थिक स्थिती बेताची झाली. धान्य उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शिवाय धानांवर विविध रोगांचा पादुर्भाव झाला. अतिवृष्टीने धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जे काही पीक हातात आले. त्यासाठी दिवाळी आटोपूनही शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विलंब केला.त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली. दरम्यान, बहुप्रतिक्षेनंतर का होईना सावरगाव आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थेच्या केंद्रात धान खरेदी सुरु करण्यात आल्याने कार्यक्षेत्रातील गावांतील  शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या केंद्रावर प्रथम ग्राहक म्हणून वलनीचे चंद्रशेखर मारोती मेश्राम या शेतकऱ्यांनी हजेरी लावली. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती  होती.

Web Title: Launch of Paddy Procurement Center at Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.