शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

- अन् त्याचे पाय व डोक्यावरच करावा लागला अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध  घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व  गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरिरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते. 

राजकुमार चुनारकर चिमूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत  हल्लेखोर वाघाने रामदासच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. नातेवाईक व  गावकऱ्यांच्या हाती रामदासचे फक्त  पाय व डोके सापडले. त्यामुळे नागरिकांना केवळ रामदासच्या डोके व पायावरच अंत्यसंस्कार करावे लागले. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.चिमूर तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल लागून असल्याने मांसळ, कोलारा, मदनापूर, शेडेगाव, सोनेगाव, बंदर, खडसंगी, झरी आदी गावांच्या सीमा व्याघ्र प्रकल्पालगत आहेत. त्यामुळे या गावाच्या लगत वाघांचे वास्तव्य आहे तर दोन दिवसांपूर्वी चिमूर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. अनेक जनावरांचा वाघाकडून फडशा पाडला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या रामदासकडे चार-पाच  एकर शेती असल्याने रामदास शेतीतूनच आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी  असा परिवार आहे. गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध  घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व  गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरिरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते. मृत्यूनंतर धर्म संस्कृतीनुसार मृताचे आप्तजन त्याला तिरडीवर नेऊन मोक्षघाटावर अंतिम संस्कार करतात. मात्र, ३९ वर्षीय रामदास गायकवाड याच्या नशिबी मात्र वेगळेच काही होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणातील अंतिम विधीचे सौख्यही त्याला मिळाले नाही. नातलगांना रामदासच्या डोके व पायाचेच अंत्यसंस्कार करावे लागले. परिसरातील असा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चा सध्या गावात आहे.

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरणसध्या शिवारात शेतकऱ्यांची कापूस वेचणी, गहू व चणा पेरणीचे काम सुरु आहे. मात्र, चिमूर परिसरात दोन दिवसांपूर्वी चावडी परिसरातील शेतात वाघाने डुकराची शिकार केली तर शुक्रवारी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील शिवारात वाघाने देविदास गायकवाड यांना ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ