सहकारी भात गिरणीला अखेरची घरघर

By Admin | Updated: May 9, 2014 02:46 IST2014-05-08T23:41:34+5:302014-05-09T02:46:45+5:30

देवाडा खुर्द : सहकारातून समृध्दीचे स्वप्न पाहणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील सहकारी भात गिरणीला ग्रहण लागले आहे.

The last house of the cooperative rice mill | सहकारी भात गिरणीला अखेरची घरघर

सहकारी भात गिरणीला अखेरची घरघर

देवाडा खुर्द : सहकारातून समृध्दीचे स्वप्न पाहणार्‍या पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील सहकारी भात गिरणीला ग्रहण लागले आहे. त्यामुळे ही सहकारी भात गिरणी आता डबघाईस आली आहे. ही सहकारी संस्था उभारताना तत्कालिन नेते मंडळीनी मोठे परिश्रम घेतले. मात्र काही काळानंतर सहकाराची चळवळ मंदावली आणि तालुक्यातील या सहकारी भातगिरणीवर अवकळा आली आहे. गोंडपिपरी तालुका निर्मीती होण्याच्या पूर्वीपासून चालविण्यात येत असलेल्या श्रीकृष्ण सहकारी भात गिरणीवर १०१ सभासदांनी आपली सभासद रक्कम भरून या भात गिरणीची स्थापना केली, तर अनेक ठेवीदारांनी आपली ठेवीची रक्कमसुद्धा गुंतविली. पोंभुर्णा व देवाडा खुर्द या दोन गावादरम्यान मुख्य रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या या सहकारी भात गिरणीवर व्यवस्थापक मंडळाने पहिले अध्यक्ष म्हणून शंकर पाटील बुरांडे यांची केली. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात काही प्रमाणात प्रगती सुद्धा झाली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत चिंतामण पोटवार हे अध्यक्ष पदावर आरूढ झाले आणि त्यानंतर हळूहळू अनेक अध्यक्ष व व्यवस्थापक मंडळाचे सदस्य तथा कर्मचारी बदलत गेले. काळाच्या ओघात सहकारी भात गिरणीकडे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे या भात गिरणीचे तीन-तेरा वाजले आणि आता ती डबघाईस आली आहे. तालुक्यातील या भातगिरणीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. शेतकर्‍यांच्या समृध्दीसाठी तालुक्यातील देवाडा खुर्द येथे श्रीकृष्ण सहकारी भात गिरणीची स्थापना सन १९६५ साली करण्यात आली. काही वर्षे ही गिरणी सुरळीत चालली. त्यानंतर मात्र सदर भात गिरणीला घरघर लागणे सुरू झाले. एवढेच नव्हे तर ही भात गिरणी कर्जाच्या ओझ्याखाली दबली. या भातगिरणीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २० लाखांचे कर्ज असून तिच्यावर आता जप्तीसुद्धा आली आहे. मात्र ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जिवाचे रान करून ही भात गिरणी उभी करण्यासाठी आपली सभासद फी गुंतविली, त्याचे काय? असा प्रश्न संबधित ठेवीदार व सभासदांमध्ये निर्माण झाला असून या भात गिरणीचे लिलाव झाल्यास सन १९६५ पासून सभासद रक्कम भरलेल्या सभासदांचे पैसे कोण देणार? असे एक ना अनेक प्रश्न ठेवीदारांमध्ये निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: The last house of the cooperative rice mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.