आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी; समुपदेशनाने होणार प्रवेश

By साईनाथ कुचनकार | Published: October 6, 2023 04:36 PM2023-10-06T16:36:46+5:302023-10-06T16:37:00+5:30

८ ते १० ऑक्टोबर दरम्यान चालणार प्रक्रिया

Last chance for students to get admission in ITIs; Admission will be through counselling | आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी; समुपदेशनाने होणार प्रवेश

आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी; समुपदेशनाने होणार प्रवेश

googlenewsNext

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत चौथी समुपदेशन फेरी सुरू झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळणार आहे.

नोंदणीकृत तसेच अप्रवेशित उमेदवारांना संस्था तसेच व्यवसायनिहाय रिक्त जागांवर समुपदेशनाने प्रवेश मिळणार आहे. यासाठी उमेदवारांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे लागणार आहे. १० ऑक्टोबर २०२३ दरम्यान संबंधित संस्थेत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी मूळ प्रमाणपत्र सोबत नेणे गरजेचे आहे. अजूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना चौथी समुपदेशन फेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करावे लागणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश शुल्क भरणे, पूर्वीचे व आता भरलेले अर्ज निश्चित करणे आदी कामे उद्या दि.७ ऑक्टोबरपूर्वी करावी लागणार आहेत.

नोंदणीकृत व अप्रवेशित विद्यार्थ्यांनी संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी व्यक्तिशः उपस्थित राहावे. यावेळी मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान आपला प्रवेश निश्चित करून अखेरच्या संधीचा लाभ घ्यावा.
-रवींद्र मेहेंदळे

प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपू

Web Title: Last chance for students to get admission in ITIs; Admission will be through counselling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.