चंद्रपूरच्या गोलबाजारात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:20+5:302021-03-17T04:29:20+5:30

चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये शांत असलेला गोल बाजार आता मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे. मात्र, बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने व्यावसायिकांसह ...

Lack of facilities in Chandrapur's Golbazar | चंद्रपूरच्या गोलबाजारात सुविधांचा अभाव

चंद्रपूरच्या गोलबाजारात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये शांत असलेला गोल बाजार आता मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे. मात्र, बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: बाजारातील रस्ते अगदीच निमुळते असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

चंद्रपूर शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोल बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या बरीच आहे. किराणा ते भाजीपाल्यापर्यंतच्या सर्वच वस्तू या बाजारात विकत घेता येतात. कापड दुकानांची संख्या वाढल्याने ग्राहकांची दरदिवशी मोठी गर्दी होत आहे. सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळणाऱ्या गोल बाजारात मूलभूत सुविधा नाहीत. सध्या येथील व्यावसायिक सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. याच बाजारात किरकोळ भाजी विक्रेतेहीे दुकाने लावतात़.

Web Title: Lack of facilities in Chandrapur's Golbazar