रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी कृपाली मुसळे हिची राज्य स्तरावर निवड

By साईनाथ कुचनकार | Updated: January 16, 2024 20:08 IST2024-01-16T20:08:04+5:302024-01-16T20:08:17+5:30

राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदक प्राप्त केले.

Kripali Musale State Level Selection for Roller Skating Competition | रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी कृपाली मुसळे हिची राज्य स्तरावर निवड

रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी कृपाली मुसळे हिची राज्य स्तरावर निवड

चंद्रपूर : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरद्वारा रोलर स्केटिंग विभागीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात इन्स्पायर ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स चंद्रपूरची विद्यार्थिनी कृपाली ज्ञानेश्वर मुसळे हिने ३ किमी रोड रेस, १ किमी व ५०० मीटर रिंक रेसमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम स्थान प्राप्त केले. तिची राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदक प्राप्त केले. ती क्रीडा प्रशिक्षक विनोद निखाडे, प्रवीण चवरे यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करते. संस्थेचे अध्यक्ष विजय बदखल, प्राचार्य पोटे, क्रीडा शिक्षक दाते, मंगल दुबे, राजूरकर, रिद्धी तिवारी आदींनी तिचे कौतुक केले.

Web Title: Kripali Musale State Level Selection for Roller Skating Competition