विदेशात जाणाऱ्यांसाठी उद्या कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:07+5:302021-06-22T04:20:07+5:30
आतापर्यंत एकही डोस न झालेल्या नागरिकांना पहिला डोस आणि २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण ...

विदेशात जाणाऱ्यांसाठी उद्या कोविड लसीकरण
आतापर्यंत एकही डोस न झालेल्या नागरिकांना पहिला डोस आणि २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिताच आहे. शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी व टोकियो येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व इतर आवश्यक निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ही लस घेता येणार आहे.
बॉक्स
लसीकरणासाठी लागणारे पुरावे
विदेशातील दाखल झालेल्या संस्थेचे दस्ताऐवज अथवा ज्या संस्थेसोबत नोंदणी होणार आहे. त्या संस्थेसोबतच्या व्यवहाराचा तपशील आवश्यक आहे. जे विद्यार्थी यापूर्वीच विदेशात शिक्षण घेत आहे, ते विद्यार्थी संस्थेत रुजू होण्यासाठी केलेल्या व्यवहाराची प्रत सोबत आणावी. नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्यांनी मुलाखतीचे पत्र किंवा नोकरी मिळाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. टोकियो ऑलंपिक खेळात जाणाऱ्यांसाठी नामनिर्देशित झाल्याचे दस्ताऐवज सादर करावे. लस घेण्यासाठी केंद्रात पासपोर्ट सोबत आणणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.