स्वाभिमानी लढा उभारण्यासाठी कोरेगाव भीमा यशोगाथा प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:12+5:302021-01-02T04:24:12+5:30
चंद्रपूर : १ जानेवारी १८१८ रोजी ५०० शूरवीर महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांना धूळ चारली. त्यांच्या निर्बंधांना कंटाळून स्वतःच्या ...

स्वाभिमानी लढा उभारण्यासाठी कोरेगाव भीमा यशोगाथा प्रेरणादायी
चंद्रपूर : १ जानेवारी १८१८ रोजी ५०० शूरवीर महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांना धूळ चारली. त्यांच्या निर्बंधांना कंटाळून स्वतःच्या मुक्तीसाठी संघर्ष केला. महार सैनिकांचे हे शौर्य खरेच सलामीस पात्र असून प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती समिती महोत्सव समितीचे संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी केले.
कोरेगाव भीमा शौर्य दिवस समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चंद्रपूर येथील युवकांनी उभारलेल्या कोरेगाव भीमा स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी वतन ब्राह्मणे, अभिषेक जीवन, पंकज पेरगे, वैभव वाघमारे, विशाल कुडवे, रोहन माऊलीकर, निखिल गौरकर, वैभव रामटेके यांचा डॉ. बंडू रामटेके, इंजि. शेषराव सहारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विशालचंद्र अलोणे, अशोक निमगडे, हरिदास देवगडे, प्रेमदास बोरकर, रवी मून, केशव रामटेके, नागसेन वानखेडे, वामनराव चंद्रिकापुरे, प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, अभिजित तोतडे, रंजित उक्के, सुमित हस्ते, निर्मला नगराळे, मृणाल कांबळे, प्रेरणा करमरकर, ज्योती शिवणकर, लुंबिनी गणवीर, आदी उपस्थित होते.