'सोशल मिडिया’द्वारे जि.प.चे विद्यार्थी घेताहेत ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:53+5:30

गटशिक्षणाधिकारी फटींग व केंद्रप्रमुख कुमरे यांच्या कल्पनेतून हा गृ्रप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थी ग्रुपवर आलेल्या भाषा, गणित, सामान्यज्ञान आदी विषयांवरील प्रश्न सोडवतात. गोष्ट पूर्ण करतात. गणितीय कोडे भाषिक कोडे सोडवतात. अशा विविध विषयांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही मार्गदर्शन करण्यास सरसावले आहेत.

Knowledge lessons that GP students are receiving through 'social media' | 'सोशल मिडिया’द्वारे जि.प.चे विद्यार्थी घेताहेत ज्ञानाचे धडे

'सोशल मिडिया’द्वारे जि.प.चे विद्यार्थी घेताहेत ज्ञानाचे धडे

ठळक मुद्देकोरोना सुट्यांचा उपयोग : पालकही करतात मार्गदर्शन

सचिन सरपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुट्टी जाहीर झाली. मात्र, विद्यार्थी सुट्टीचा वापर अभ्यासासाठी करतील याची खात्री नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व उपक्रमशील शिक्षकांनी जि. प. उच्च प्राथमिक शाळा कवठी येथील विद्यार्थांसाठी ‘किलबिल व्हॉट्सग्रुप' तयार करून ज्ञानाचे धडे देत आहेत.
गटशिक्षणाधिकारी फटींग व केंद्रप्रमुख कुमरे यांच्या कल्पनेतून हा गृ्रप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थी ग्रुपवर आलेल्या भाषा, गणित, सामान्यज्ञान आदी विषयांवरील प्रश्न सोडवतात. गोष्ट पूर्ण करतात. गणितीय कोडे भाषिक कोडे सोडवतात. अशा विविध विषयांचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही मार्गदर्शन करण्यास सरसावले आहेत. यातून उत्तम मातीकाम, कागद कामाची कलाकृती साकार झाल्या. सुजल देरकर तेजस वाढई, गोपाळ गौरकार, कृष्णा गौरकार, वैष्णव गौरकार यांनी स्वानुभवातून मातीपासून गणपती मूर्ती तयार केली.
अंशु ताजने याने निरूपयोगी वस्तुंपासून वाहन, आचल जुनघरे हिने धान्यापासून हत्ती तयार केला. रोशन मोहितकर याने तीन अंकी संख्येची बेरीज अचूक सोडविली. सहकार्य करणारी त्याची बहिण रेश्मा हिनेही स्वत:चा अभ्यास करून मार्गदर्शन केले. दिव्यांनी ताजने, तन्वी येरगुडे, श्रेया वाघाडे यांच्यासारख्ये बरेच विद्यार्थ्यांमध्ये आता अभ्यासाची चुरस निर्माण झाली. विशेष म्हणजे एकाच मोबाईलवरून २-३ विद्यार्थी चाचणी सोडवतात, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी फटींग यांनी दिली.
 

Web Title: Knowledge lessons that GP students are receiving through 'social media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.