शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन क्विंटलऐवजी किलोत

By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST

टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे

टेमुर्डा : टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही अनेक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. ज्यांच्या हाती आले ते क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचावा म्हणून उभे पिकच वखरुन टाकले आहे. वरोरा तालुक्यातील २१ हजारावर हेक्टरमध्ये सोयाबिनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतांमध्ये सोयाबीनचे उत्पादन झाले, तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पूर्णपणे नष्ट झाले. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला, तर दुसरीकडे रब्बी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजुंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातूनच पिजदुरा येथील संतोष नारायण नक्षिणे (५२) या शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. सोयाबीनकडे रोखीचे पीक म्हणून पाहिल्या जाते. आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने यंदा कापसाचा हमी भाव जाहीर करताना क्विंटलमागे केवळ ५० रुपयांची वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रुपये आहे. बागायती कपाशीला एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. मात्र हाती येणारे उत्पन्न व त्याला मिळणारा बाजारभाव यामुळे हा खर्च निघण्याचीही आशा आता मावळली आहे. (वार्ताहर)