बुलडाण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे अपहरण, धर्मांतराचा प्रयत्न

By Admin | Updated: September 13, 2014 01:18 IST2014-09-13T01:18:05+5:302014-09-13T01:18:06+5:30

बुलडाणा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

Kidnapping of engineering student in Buldhada, conversion attempt | बुलडाण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे अपहरण, धर्मांतराचा प्रयत्न

बुलडाण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे अपहरण, धर्मांतराचा प्रयत्न

बुलडाणा : लव्ह जिहादच्या मुद्यावर देशभरात वादळ सुरू असताना, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बुलडाणा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये गुरूवार, ११ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, बुलडाण्यातील इंदिरानगर भागातील मोहसीन शेख हा संगम चौकातील एका मोबाईल फोनच्या दुकानात कामाला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी या दुकानावर तिचा मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी जायची. त्यामुळे मोहसीनला तिचा मोबाईल फोन नंबर सहजच मिळाला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधून, मैत्री केली. कालांतराने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार जून महिन्याच्या अखेरिस घडला होता. दरम्यान, २८ जून रोजी विद्यार्थिनीच्या वडिलांनी बुलडाणा पोलिसांकडे मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती; परंतु, तत्पूर्वी मोहसिनने विद्यार्थिनीला भिवंडी येथे बहिणीच्या घरी नेले होते. तिथे आपले धर्मांतर करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असल्याचा आरोप युवतीने केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस या विद्यार्थिनीने मुंबईतील भिवंडी येथील एका पोलिस कॉन्स्टेबलची भेट घेऊन त्याला आपबिती कथन केली. त्या कॉन्स्टेबलने २५ ऑगस्ट रोजी तिला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा याप्रकरणी भादंवि कलम ३६३, ३६६, ३६७, ३४२ आणि १0९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये मोहसीन शेख, आई मेहरूनिस्सा शेख, सलीम खान, शाहिस्ता शेख यांचा समावेश आहे.

Web Title: Kidnapping of engineering student in Buldhada, conversion attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.