शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांवरील केरोसिन बंदचे कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:35 IST

राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस सिलिंडर कनेक्शनधारक शिधात्रिका धारकांसह ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकांचे केरोसीन बंद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. या कुटुंबांनी स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न उपस्थित करून हे राज्य सरकारचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान सभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस सिलिंडर कनेक्शनधारक शिधात्रिका धारकांसह ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकांचे केरोसीन बंद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. या कुटुंबांनी स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न उपस्थित करून हे राज्य सरकारचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान सभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या आदेशान्वये शिधापत्रिकाधारकांकडून गॅस कनेक्शन नसल्याचे ‘हमीपत्र’ भरून घ्यावे. ज्यांनी ते लिहून दिले त्याच कुटुंबांना केरोसिन देण्यात येणार आहे. वास्तविक, ही माहिती असंख्य गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांकडे पोहचलीच नाही. वास्तविक, कुणाकडे गॅस कनेक्शन आहे ना नाही याची माहिती पुरवठा विभागाकडे आहे. मग हमीपत्राची गरज काय, असा सवालही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबाकडे कुठलेही गॅसचे कनेक्शन नाही, अशा कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे केरोसीन मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन देण्यात यावे, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४ लाख ९९ हजार ८४७ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. पैकी एक वा दोन गॅस कनेक्शनधारक कुटुंबांची संख्या ३ लाख ६७ हजार ५५३ इतकी आहे. १ लाख ३२ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांकडे गॅस कनेक्शनच नाही. या कुटुंबाना केरोसिन मिळणे क्रमप्राप्त आहे, मात्र त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, याकडेही आ. वडेट्टीवाप यांनी लक्ष वेधले.यावेळी माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्रात्रेय, विनायक बांगडे, आसावरी देवतळे व अन्य पदाधिकारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे यांच्यासह चंद्रपूर -गडचिरोली जिल्हा केरोसिन डिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.८ व ९ जानेवारीला काँग्रेसची संघर्ष यात्रा जिल्ह्यात८ व ९ जानेवारी २०१९ रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात निघालेली संघर्ष यात्रा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. राज्यातील सर्व वरिष्ठ नेते या यात्रेत सहभागी असणार आहे. दरम्यान, जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने सर्व जि.प. सदस्य व काँगे्रसच्या सर्व तालुकाअध्यक्षांची बैठक पार पडली. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गाव व घरापर्यंत हे अभियान पोहचणार असून राज्य व केंद्र सरकारने राबविलेल्या चुकीच्या योजनांची माहिती देणार आहे, असेही आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.