कर्नाटक पॉवर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST2021-11-10T05:00:00+5:302021-11-10T05:00:52+5:30
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नरेंद्र जिवतोडे, प. सं. सभापती प्रवीण ठेंगणे आदींची उपस्थिती होती.

कर्नाटक पॉवर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनद्वारा बरांज, किलोनी, मानोरा खुल्या कोळसा खाणीचे प्रकल्पग्रस्त, शेतकरी व कामगारांच्या समस्यांचे निवारण व पुनर्वसन कराराची कार्यवाही करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी कर्नाटकचे उर्जामंत्री, कंपनीचे उच्चधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले.
विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासह नवी दिल्लीत भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नरेंद्र जिवतोडे, प. सं. सभापती प्रवीण ठेंगणे आदींची उपस्थिती होती.
सुरक्षा कर्मचारी वेतनाविना
बरांज, किलोनी, मानोरा डिप खुली कोळसा खाणीत कार्यरत सुरक्षा कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून सुरक्षा गार्ड वेतन मिळाले नाही. प्रकल्प प्रभावित नागरिक, शेतकरी, कामगार व ठेकेदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही आ. मुनगंटीवार यांनी ना. जोशी यांच्याशी चर्चेदरम्यान केला.