ंकाळ्या बनियनधारी टोळीची चंद्रपुरात दहशत
By Admin | Updated: September 13, 2014 23:46 IST2014-09-13T23:46:42+5:302014-09-13T23:46:42+5:30
येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही

ंकाळ्या बनियनधारी टोळीची चंद्रपुरात दहशत
चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही पोलिसात तक्रार देण्यास धजावत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. लुटणारी ही टोळी चार ते पाच जणांची असल्याची माहिती आहे. आता नागरिक रात्री समुहाने कॉलनीत गस्त घालत असून एकमेकांनी शेजाऱ्यांचे मोबाईल नंबर घेतले आहे. रात्री दार वाजल्यास प्रथम मोबाईलवर संपर्क करा, असा संदेशही परिसरात नागरिकांनी सुरक्षतेसाठी देणे सुरु केले आहे.
येथील सिस्टर कॉलनीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचे वास्तव्य आहे. बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसाय करतात. रात्री शांत असलेल्या या कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून २० ते २५ वर्षांचे तीन ते चार युवक काळ्या रंगाची बनियन तसेच हातात चाकू आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत रात्री फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ते रात्री घराचा दरवाजा वाजवितात. दरवाजा काढल्यानंतर चाकूच्या धाकावर पैसे तसेच सोन्याचे दागिने मागतात. एवढेच नाही तर, पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही देत आहे. अनेकांना लुटले असतानाही कुणीही पोलिसात तक्रार दिली नाही.