जरा हटके! ‘त्यांच्या’ केवळ स्पर्शाने लागतो बल्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:23 AM2019-03-11T10:23:04+5:302019-03-11T10:25:17+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील एका कुटुंबातील तिघेजण वीज बल्बला स्पर्श करताच ते प्रकाशमान होतात.

Just different! 'They' lightened the bulb only by touching the finger | जरा हटके! ‘त्यांच्या’ केवळ स्पर्शाने लागतो बल्ब

जरा हटके! ‘त्यांच्या’ केवळ स्पर्शाने लागतो बल्ब

Next
ठळक मुद्देकपाळाच्या स्पर्शानेही लागतो बल्बएकाच कुटुंबातील तिघे साधतात ही किमया

संघरक्षित तावाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जगातच नाही तर सृष्टीत अनेक चमत्कार बघायला मिळतात. या प्रत्येकामागे काहीतरी वैज्ञानिक कारण दडलेले असते. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील एका कुटुंबातील तिघेजण वीज बल्बला स्पर्श करताच ते प्रकाशमान होतात. ही बाब पंचक्रोशीत कुतुहलाचा विषय ठरली आहे. मात्र हा चमत्कार आहे की यामागेही वैज्ञानिक कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
जिवती येथील शाहरूख अली युसूफ अली सय्यद (२१), समीर अली युसूफ अली सय्यद (१९) व त्यांचा भाचा अनास शादूल शेख अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही एका कुटंबातील आहेत. विद्युत पुरवठ्याविनाच ते हाताच्या बोटाने व कपाळाने एल.ई.डी. बल्ब प्रकाशमान करतात. आणि ही बाब दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या लक्षात आली. हा प्रकार माहित होताच हे तिघेही प्रकाशझोतात आले.
याबाबत पंचक्रोशित चर्चा सुरू असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने सय्यद यांच्या घरी भेट दिली. यावेळी शाहरुख त्याचा भाऊ समीर व दोघांचाही भाचा अनास या तिघांनीही हा चमत्कार करून दाखविला. इलेक्ट्रिक वायरचा किंवा अन्य कुठल्याही वस्तुचा आधार न घेता शाहरुख बोटाच्या स्पर्शाने, समीर कपाळाने तर अनासही बोटाच्या स्पशाने वीज बल्ब प्रकाशमान करीत असल्याचे दिसून आले.
शाहरूख व समीर चंद्रपूर येथे शिक्षणासाठी राहतात. १० वर्षांचा अनास हा चौथ्या वर्गात असून तो जिवती येथेच शिकतो. कोणताही विद्युत पुरवठा नसताना केवळ स्पर्शाने एलईडी बल्ब प्रकाशमान होते, हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.

Web Title: Just different! 'They' lightened the bulb only by touching the finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.