जुनोना जंगलातून दारूचा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:41+5:302021-01-15T04:23:41+5:30

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी जुनोना जंगलात मोठी ...

Junona seized a liquor truck from the forest | जुनोना जंगलातून दारूचा ट्रक जप्त

जुनोना जंगलातून दारूचा ट्रक जप्त

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी जुनोना जंगलात मोठी कारवाई केली. यावेळी ९० देशी दारूच्या पेट्या आणि ट्रक असा एकूण २४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात ६०४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दारूची मोठी तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळी नईम खान पठाण यांना एमएच १०-बीआर-८९७७ क्रमांकाच्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात असून, जुनोना जंगलात दारू उतरविली जाणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, राजकुमार देशपांडे, नईम खान पठाण, गणेश भोयर, अमोल धंदरे, नरेश डाहुले, प्रदीप मडावी या पथकाने जुनोना जंगलात छापा टाकला. यावेळी जंगलात रस्त्याच्या कडेला ट्रक आढळून आला. मात्र, ट्रकचालक तेथे नव्हता. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता भाजीपाला नेणारे ट्रे आढळून आले. आतमध्ये पुन्हा दारू तस्करीसाठी विशेष कप्पा तयार करण्यात आला होता. पोलिसांनी विशेष कप्प्याची पाहणी केली असता तेथे ९३ पेट्या देशीदारूचे बॉक्स आढळून आले.

पोलिसांनी दारूसाठा, वाहन असा एकूण २४ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चालकाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दारू नेमकी कुठून आणली जात होती आणि ती कुणाकडे जात होती, या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Junona seized a liquor truck from the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.