कापसाच्या जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:35 IST2018-03-16T00:35:43+5:302018-03-16T00:35:43+5:30

तालुक्यातील वनसडी येथील वैभव प्रायवेट लिमिटेड या कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागली. यात हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.

Junking of Cotton | कापसाच्या जिनिंगला आग

कापसाच्या जिनिंगला आग

ठळक मुद्देवनसडी येथील घटना : एक कोटींच्या नुकसानीचा अंदाज

ऑनलाईन लोकमत
कोरपना : तालुक्यातील वनसडी येथील वैभव प्रायवेट लिमिटेड या कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागली. यात हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.
यात जिनिंग मालकाचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्वप्नील भंडारी यांच्या मालकीचे सदर जिनिंग आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक जिनिंगमधील कापसाला आग लागली.
अग्निमशन दलाचा तत्काळ पाचारण करण्यात आले. मात्र आग आटोक्यात येत पर्यंत हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. स्वप्नील भंडारी यांनी याप्रकरणी कोरपना पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कोरपना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील पंचनामा सुरू आहे. सदर आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Web Title: Junking of Cotton

टॅग्स :fireआग