स्पर्धा परीक्षेच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:34+5:30
सन २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयादित परीक्षेत मूळ मागणी पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील २३० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या ६३६ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर सामावून घेण्याबाबतचा शासन निणर्य देण्यात आला होता.

स्पर्धा परीक्षेच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या २०१६ मधील ६३६ उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी पोलीस बॉइज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
सन २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयादित परीक्षेत मूळ मागणी पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील २३० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या ६३६ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर सामावून घेण्याबाबतचा शासन निणर्य देण्यात आला होता. सदर शासन निर्णयावरून पोलीस महासंचालक यांनी सदर ६३६ उमेदवारांना प्रशिक्षणकामी पाठविणे असल्याने त्यांचे वैद्यकीय तपासणी करण्याबाबत तसेच उमेदवारांकडून साक्षांकन नमुने सादर करण्याबाबत घटक प्रमुखांना आदेशित केले होते. यावरून सर्व उमेदवारांचे साक्षांकन नमुने सादर करण्यात आलेले आहे. तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल हासुद्धा कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होऊन जवळपास ८ महिने कालावधी झालेला आहे.
परंतु, अजूनपर्यंत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले नाही. तसेच पोलीस उपनिरीक्षक ६३६ उमेदवारांवर हा एक प्रकारचा अन्याय होत आहे. तरी गृहमंत्री यांनी लक्ष देऊन त्या उमेदवारांना न्याय द्यावा व त्यांना तत्काळ प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
उमेदवारांनी अत्यंत मेहनत घेत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र अभ्यास करुन यशप्राप्त केली आहे. मात्र आठ महिन्यांपासून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने अडचण जात आहे.
निवेदन देताना पोलीस बॉइज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, कार्यकारी अध्यक्ष तोजितचंद्र पिपरे, जिल्हा संघटक सदाम अन्सारी, शहर अध्यक्ष विवेक आत्राम, शहर संघटक साहील मडावी, शहर उपाध्यक्ष देविदास बोबडे, सहसचिव अमित वाघमारे, मार्गदर्शक सल्लागार गजू चंचुवार, विधी सल्लागार आशीष नगराळे व सोहल शेख, सोनू शेख, संतोष कांबळे, पीयूष डोंगरे, विक्की डोंगरे आदींची उपस्थिती होती.