शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार

By admin | Updated: March 23, 2015 01:13 IST

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत.

भद्रावती : चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत. या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश चुधरी यांना भ्रमणध्वनीवरून दिले.प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकापेक्षा अनेकांना नोकरीत सामावून घेण्यात आले असून, काहींना नोकरी देण्यासाठी कायद्यावर बोट ठेवून औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, पूर्नवसन अधिकारी हे अडवणूक करीत असल्याचा आरोप सरपंच प्रकाश चुधरी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राकरिता ५२ गावांच्या शेतजमीनी संपादीत करण्यात आल्या. यातील काही प्रकल्पग्रस्तांना शेती, घरे, वऱ्हांडा, झोपडी, गुरांचा गोठा यावरती नोकरीत सामावून घेण्यात आले. परंतु हाच निकष उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना लागू करण्यासाठी अधिकारी असमर्थता दर्शवित आहेत. एकाच कुटुंबातील अनेकांना तसेच प्रकल्पग्रस्तांशी नातेसंबंध जुळत नसलेल्या इतरांना नामनिर्देशनसाठी दिलेल्या पत्रावर या अधिकाऱ्यांनी नोकरीत सामावून घेतले आहे. वास्तविक पाहता नियमानुसार प्रकल्पग्रस्तांचे रक्तातील नाते संबंधितांनाच नोकरीचा अधिकार प्राप्त होतो. सरपंच चुधरी यांनी ही बाब वेळोवेळी पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अधिकाऱ्यांनी व्यवस्थीत उत्तर न देता डावलण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने चुधरी हे गेल्या तीन ते चार वर्षापासून संघर्ष करीत आहे. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षदा दिले. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संभाषण केले व ही बाब त्यांना सांगितली. (शहर प्रतिनिधी)