ज्युबिली हायस्कूलने रोवला मानाचा तुरा
By Admin | Updated: November 6, 2014 01:11 IST2014-11-06T01:11:16+5:302014-11-06T01:11:16+5:30
इंग्रजकालीन ज्युबिली हायस्कूल आपल्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहे. प्राचीन विद्यालय म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयाने आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे.

ज्युबिली हायस्कूलने रोवला मानाचा तुरा
चंद्रपूर: इंग्रजकालीन ज्युबिली हायस्कूल आपल्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहे. प्राचीन विद्यालय म्हणून ओळख असलेल्या या विद्यालयाने आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे. विद्यार्थी घडविण्याचे काम करणाऱ्या या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्चपदावर गेले आहे. एवढेच नाही तर, शाळेत शिक्षण घेणाऱ्यांपैकी तब्बल चार जणांना मंत्रीपद मिळाले आहे.
यातील मा.सा.कन्नमवार यांनी मुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. या याळेतील माजी विद्यार्थी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आता राज्याच्या अर्थमंत्र्याची जबाबदारी आली आहे.
ज्युबिली हायस्कूल राज्याला एक मुख्यमंत्री आणि तीन मंत्री देणारे जिल्ह्यात पहिले विद्यालय ठरले आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, राज्य मंत्रिमंडळात वनमंत्री राहिलेले जिल्ह्यातील दिवंगत नेते वामनराव गड्डमवार आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे.
राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा. कन्नवार हे ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. १९४२ ते १९४४ या कालावधीत पोटदुखे ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते. राज्य मंत्रिमंडळात वनमंत्री राहिलेले जिल्ह्यातील दिवंगत नेते वामनराव गड्डमवार सुद्धा ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते. १९४९ ते १९५५ या कालावधीत गड्डमवार ज्युबिली हायस्कूलचे विद्यार्थी होते.
राज्याचे नवनियुक्त वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याच विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. १९७० ते ७६ या कालावधीत मुनगंटीवार ज्युबिली हायस्कूलमधून ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
या महाविद्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत के. सुदर्शन आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा शिक्षण घेतले आहे. तर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, क्रिकेटर पी.के. नायडू, लोकनायक श्रीहरी अणे, साहित्यिक वा.कृ.चोरघडे, के.जी. पुरोहित, आयएएसमध्ये आर.एन. बोनगीरवार, सुरेश जोशी, मधुसूधन ताकसाळे, जी.आर. देवईकर, आयपीएसमध्ये गोवर्धन, गोहोकर यांच्यासह अनेक मान्यवरांनीही या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. (नगर प्रतिनिधी)