वणी येथील ओबीसी विशाल मोर्चात सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:18+5:302021-01-02T04:24:18+5:30
चंद्रपूर : ओबीसींचे संविधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीचा रकाना टाकून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना ...

वणी येथील ओबीसी विशाल मोर्चात सहभागी व्हा
चंद्रपूर : ओबीसींचे संविधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीचा रकाना टाकून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरमध्ये २६ नोंव्हेबर रोजी संविधान दिनी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून मोर्चे काढण्यात आले. याच अनुषंगाने ३ जानेवारीला महिला शिक्षण दिन क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीला वणी येथे ओबीसी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी पूर्ण ताकदीने सहभागी होऊन एकता दाखवावी, असे आवाहन चंद्रपूर ओबीसी जनगणना समन्वय समितीने केले आहे.
मोर्चात सहभागी होण्यासाठी २ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रपूर येथून ४ वाजता ओबीसी सायकल मार्च काढण्यात येणार आहे. समारोप वणी येथील ओबीसी विशाल मोर्चात करण्यात येणार आहे. वणी येथील ओबीसी विशाल मोर्चाला ओबीसी जनगणना समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दिला असून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. माधव गुरनुले, बंडूभाऊ हजारे, प्रा. विजय बदखल, ॲड. प्रशांत सोनुले, प्रा. अनिल डहाके, अविनाश आंबेकर, सतीश मालेकर, डॉ. सिराज खान, प्रा. विजय मुसळे, डॉ. बाळकृष्ण भगत, विवेक बोरीकर, सूरज मत्ते, आदींनी केले.