जेसीआय राजुरा रॉयल्सचे नवचेतना शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:39+5:302021-04-22T04:29:39+5:30
ऑनलाईन आयोजित या शिबिरात राजस्थानातील उदयपूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका इंदिरा तेलरेजा, चित्तोडगढ येथील नीता सावंत, बंगाल राज्यातील ...

जेसीआय राजुरा रॉयल्सचे नवचेतना शिबिर
ऑनलाईन आयोजित या शिबिरात राजस्थानातील उदयपूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका इंदिरा तेलरेजा, चित्तोडगढ येथील नीता सावंत, बंगाल राज्यातील कोलकाता येथील पूनम बंडावार यांनी या शिबिरात प्राणायाम, योगा, मेडिटेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सात्विक भोजन शरीरासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी मांडले. या शिबिराद्वारे कोविड-१९ विषाणूच्या महामारीच्या प्रकोपात कोणते योगासन केल्याने त्याचा अधिक लाभ होईल, स्वतःला आनंदी कसे ठेवावे, शरीराला निरोगी कसे ठेवावे याविषयी वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शोभा काबरा यांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. या ऑनलाईन शिबिरात महाराष्ट्रातील अनेक लोक सहभागी झाले. चंद्रपूरचे दंत चिकित्सक व जेसीआयचे माजी अंचल अध्यक्ष डॉ. सुशील मुंधडा, जेसीआय बल्लारपूर वूड सिटीचे संस्थापक संजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने झाली. संचालन स्वरूपा झंवर व आभार प्रदर्शन मधुस्मिता पाढी यांनी केले.