शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

जटपुरा गेटवर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:18 IST

जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेची ही समस्या आहे. ती सोडविणे सोडून दोन कोटींचा खर्च करीत जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आधी वाहतूक कोंडी सोडवा; नंतरच सौंदर्यीकरण करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जटपुरा गेटवर सोमवारी धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेना : आधी कोंडी सोडवा; नंतर सौंदर्यीकरण करा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता बेजार झाली आहे. अनेक वर्षांपासून जनतेची ही समस्या आहे. ती सोडविणे सोडून दोन कोटींचा खर्च करीत जटपुरा गेटचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आधी वाहतूक कोंडी सोडवा; नंतरच सौंदर्यीकरण करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जटपुरा गेटवर सोमवारी धरणे देण्यात आले.सदर आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. धरणे आंदोलनात माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, शहर प्रमुख सुरेश पचारे, जिल्हाप्रमुख भारती दुधानी, माजी नगरसेवक आकाश साखरकर, राजेश नायडू, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, संदीप कष्टी, अब्बासभाई, इरफान शेख, अजय कोंडलेवार, चिराग नथवानी, प्रकाश चंदनखेडे, चंद्रराज बाथो, विलास वनकर, दीपक पद्म्गिरीवार, रुपेश पांडे, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, शंकर दंतूलवार, राशीद हुसैन, दिलीप बेंडले, वैभव माकडे, गौरव जोरगेवार, टिकाराम गावंडे, बबलु पुण्यवर्धन, मंगेश अहीरकर, बादल हजारे, मुकेश डाखोरे, राजेश मांगूळकर, प्रितम लोणकर, माला तुरारे, सुजाता बल्ली, महादेव अडबाले, राहुल मोहुर्ले, इरफान शेख आदींची सहभागी झाले होते. दिवसभर धरणे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही उपायही निवेदनातून सूचविण्यात आले आहे.जनतेच्या संयमाची थट्टा करू नये - जोरगेवारजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी ही चंद्रपूरकरांची मोठी समस्या आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यापेक्षा येथे सौंदर्यीकरणाची गरज लोकप्रतिनींधींना अधिक वाटणे हे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. दररोज त्रास होत असतानाही जनतेने संयम पाळला आहे. या संयमाची थट्टा करून नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असे किशोर जोरगेवार यावेळी मोर्चेकरांना संबोधित करताना म्हणाले.