जामखुळा येथे ४२ जणांनी रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:28+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामखुला येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल ४२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची परिचय दिला.

जामखुळा येथे ४२ जणांनी रक्तदानातून दिला सामाजिक बांधिलकीचा परिचय
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामखुला येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल ४२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची परिचय दिला. हे रक्तदान शिबिर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात घेण्यात आले. रक्तदान शिबिराकरिता महेश पाटील, मिथुन कुडे, आकाश बावणे, आकाश येरेकर, स्वप्नील पंकज शेंडे, अमोल माहुरे ,रवी येरेकर, गणेश सलेकर, गणेश देठे, दिवाकर येरेकर, सागर वानखेडे, अक्षय भलमे, सागर चव्हाण, राहुल टिपले, गजानन देवतळे, सूरज घुबडे, प्रतीक पाटील यांनी परिश्रम घेतले.
गडचांदूरमध्ये मान्यवरांकडून लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक
लोकमतने नेहमीच सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. अशा संकटसमयी ‘लोकमत’ने लोकमत रक्ताचं नातं हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. लोकमतची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचा सूर यावेळी मान्यवरांनी काढला. तर आकाश मोहुर्ले या तरुणाचा बुधवारी वाढदिवस होता. त्याने वाढदिवसानिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात रक्तदान करून आदर्श रचला.
यांनी केले रक्तदान
महेश पाटील, रोशन मोघे, आकाश घुबडे, स्वप्नील वावरे, आकाश येलेकर, आकाश बावणे, सागर वानखेडे, भालचंद्र मुके, संदीप पावडे, गणेश देठे, अंकित डाफ, अजय बुऱ्हाण, सुमीत मस्के, रवींद्र सोगे, कुणाल क्षीरसागर, राहुल टिपले, गजानन देवतळे, स्वराज घुबडे, सागर चौधरी, प्रवीण शिवरकर, अक्षय भलमे, जीवन क्षीरसागर, मिथुन कुळे, संकेत पावडे, गणेश येलकर, शुभम, अनिल सोळंकी, आशिष पावडे, अतुल निब्रड, अमोल माहुरे, पंकज शेंद्रे, आशिष देठे, प्रतीक पाटील, संदीप पावडे, अक्षय येलेकर, गौरव निकुरे यांचा रक्तदात्यांमध्ये समावेश होता.