शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !

By admin | Updated: February 20, 2015 00:48 IST

वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे.

सास्ती : वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ योजना सुरू करण्यात आली. परंतु तब्बल सहा वर्ष लोटूनही येथील नागरिकांची तहान भागविण्यास ही नळयोजनना कुचकामी ठरली आहे. येथील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत निमणी प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत सन २००९ मध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. वर्धा नदीवरून पाणी घेऊन कवठाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार जैतापूर येथील जलकुंभाला पाईप लाईन जोडून पाणी पुरवठा केला. मात्र आज या नळयोजनेला पाच ते सहा वर्षे होऊनही हे जलकुंभ अजूनही तहाणलेलेच आहे.जैतापूर हे गाव नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. जैतापूर येथे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु गावाच्या विकासाकडे नेहमी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येकडे ग्रामपंचायतीकडून अनामत रक्कम भरली नाही म्हणून उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवतात. जिथे शासन प्रत्येक ठिकाणी कोणतेही कारण समोर न करता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी उपाय योजना करीत आहे. तिथे जैतापूरसारख्या गावच्या जनतेला नळाच्या पाण्यातून अलिप्त रहावे लागत आहे. येथील जनतेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.जैतापूर हे गाव राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे विजेचा पुरठाही कमी दाबाचा होतो. त्यामुळे काही लोकांच्या घरी बोअरवेल असून त्यावरील पंप उन्हाळ्याच्या दिवसात चालत नाही. हीसुद्धा समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. (वार्ताहर)