‘जय कन्हैय्या लाल की’ जयघोषाने चंद्रपूर निनादले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 01:15 IST2015-09-07T01:15:47+5:302015-09-07T01:15:47+5:30

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगल दिवशी चंद्रपूरच्या श्री महर्षी विद्यामंदिराच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या ‘हाथी घोडा पालकी जय कन्हैय्या लाल की’ ...

'Jai Kanhaiya Lal Ki' Jayaghoshaya Chandrapur Ninadale | ‘जय कन्हैय्या लाल की’ जयघोषाने चंद्रपूर निनादले

‘जय कन्हैय्या लाल की’ जयघोषाने चंद्रपूर निनादले

शोभायात्रा : चंद्रपुरातील महर्षी विद्यामंदिराचे आयोजन
चंद्रपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगल दिवशी चंद्रपूरच्या श्री महर्षी विद्यामंदिराच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या ‘हाथी घोडा पालकी जय कन्हैय्या लाल की’ अशा घोषणांनी संपूर्ण चंद्रपूर शहर निनादले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री महर्षी विद्या मंदिरच्या सिव्हिल लाईन शाखेतील कार्यक्रमाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ महेंद्र कल्याणकर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार तसेच सीसीडीएम डिव्हीजन चंद्रपूर एक्झीक्युटीव इंजिनियर अर्चना घोडेस्वार हे होते.
प्रमुख अतिथी तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक तसेच सदस्य मंडळ यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पूजा करण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांच्यात दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यात मुलांचा संघ विजयी झाला.
गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथींनी नारळफोडून शोभायात्रेचा शुभारंभ केला. शोभायात्रेत श्रीकृष्णाच्या कार्यावर आधारीत देखावे ठेवण्यात आले होते. या शोभायात्रेचे शहरातील स्वामीनारायण मंदिर, गांधी चौक, लक्ष्मीनारायण मंदिर, जयंत टॉकीज आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. भाविकांनी श्रीकृष्ण कन्हैयाचे पूजन केले. स्वागतासाठी निरनिराळ्या ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या.
राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, डॉ. सुशिल मुंधडा, राजीव गांधी कॉलेजचे संचालक मतीन शेख, लोकमत समाचारचे अरुण सहाय, भाजपा युवा कार्यकर्ता सुभाष कासनगोट्टुवार, पंकज शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी पूजन केले. शोभायात्रेत गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष अनुपम चिलके, सचिव दत्तात्रेय कंचर्लावार, कोषाध्यक्ष अर्चन पोपट, सदस्य उमेश चांडक, अल्का चांडक आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jai Kanhaiya Lal Ki' Jayaghoshaya Chandrapur Ninadale