महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आवश्यक
By Admin | Updated: September 3, 2016 00:35 IST2016-09-03T00:35:11+5:302016-09-03T00:35:11+5:30
महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आज आवश्यक झाले आहे.

महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आवश्यक
गणेश हेगडे : नागभीड येथे नॅकचा एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद
नागभीड : महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आज आवश्यक झाले आहे. त्याकरिता महाविद्यालयास कोणत्या -- जावे लागणार याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पाठपुरावा करावा लागेल, असे नॅकचे राष्ट्रीय सहसल्लागार डॉ.गणेश हेगडे यांनी सांगितले.
नागभीड (निसर्गायन) येथे ‘रिसेंट मथडालॉजी आॅफ इन्स्टिट्युटशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडिटेशन बॉय नॅक’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद झाला.
भारतातील महाविद्यालयाचा दर्जा ठरविण्याकरिता स्वायत्त संस्था म्हणून नॅक (नॅशनल असेसमेंट अॅक्रिडिटेशन कौन्सिल) बंगलोरची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या राष्ट्रीय सहसल्लागार या पदावर कार्यरत व नॅकच्या कार्यप्रणालीचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. गणेश हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड, मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या परिसंवादाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्ष म्हणून मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीचे अध्यक्ष किशोर वनमाळी होते. तसेच ईस्माईल जव्हेरी प्राचार्य डॉ. नानासाहेब भडांगे, माजी अधिष्ठाता, विज्ञान शाखा तथा प्राचार्य पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ.एन.एस. कोकोडे, स्वामी रामानंदतूर्थ विद्यापीठ नांदेडच्या प्राचार्य फोरमचे अध्ंयक्ष तथा परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.अनिल कोरपेनवार, डॉ.सुरेश रेवतकर व डॉ.अमीर धम्मानी यांची उपस्थिती होती.
एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे प्रमुख वक्ते डॉ. गणेश हेगडे यांनी दोन सत्रामध्ये मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात उच्च शिक्षणातील अध्ययन अध्यापनाचे मूल्यमापण करून प्राध्यापकांची संशोधन प्रवृत्ती वाढीस लावणे आणि पायाभूत सुविधा शिक्षण संसाधन याचा विकास करून प्रशासनात नेतृत्वाचा तसेच गुणवत्ता निर्देशांक मार्गदर्शक तत्वे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात आय.क्यू.ए.सी. चा आराखडा कसा असावा, हे सांगितले.
परिसंवादाकरिता प्राप्त झालेल्या शोधलेखाचे प्रकाशन कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)