वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:56+5:30

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने महिनाभरापूर्वी वृत्त प्रकाशित करून वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

The irresponsibility of Wacoli officers endangers the lives of employees | वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

ठळक मुद्देलोकमतने वर्तविले होते भाकीत : काटाघरासमोरील शेड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पोवनी ०२ कोळसा खाणीतील अधिकाºयांच्या बेजबाबदारपणामुळे वेकोलि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असून रविवारी आलेल्या पाऊस व वादळाने काटाघरासमोरील शेड अखेर कोसळले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुन्हा एकदा वेकोलि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
४० तासांचा कालावधी उलटून गेला तरी वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वादळात कोसळलेले शेड अजूनही तसेच पडून आहे. यामुळे वेकोलिचे अधिकारी सुरक्षेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते.
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने महिनाभरापूर्वी वृत्त प्रकाशित करून वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र वेकोलिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रविवारी आलेल्या वादळाने काटाघरासमोरील शेड कोसळले. यात वेकोलि कर्मचारी आशिष बोभाटे यांची दुचाकी दबली. यात सुदैवाने वेकोलि कर्मचारी बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविणाऱ्या वेकोलिने कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेऊ नये, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोवनी ०२ कोळसा खाणींचे सब एरिया मॅनेजर सी.पी.सिंह यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता मला या घटनेची माहिती नसून वेकोलित काटा घरासमोरील कोणतेच शेड पडले नसल्याचा उरफाटा जावईशोध या जबाबदार वेकोलि अधिकाऱ्यांनी लावल्याने कर्मचाऱ्यांप्रति हे अधिकारी किती गंभीर आहे, हे वेगळी सांगण्याची गरज नाही.
वेकोलि कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाºया वेकोलिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The irresponsibility of Wacoli officers endangers the lives of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.