शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

नियोजनाअभावी पाणी पुरवठ्यात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:50 PM

शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.

ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : पाण्याअभावी शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.घुग्घुस येथे तीन पाणी पुरवठायोजना कार्यरत आहेत. त्याबरोबरच सौर उर्जेवर चालणारी योजनाही सुरू आहे. परंतु, या पाणी पुरवठा योजना मागील १५ वर्षांपासुन दरडोई ७० लिटर पाणी देऊ शकल्या नाही. सामान्य व खासगी पाणी करात तीनदा वाढ करण्यात आली. सामान्य करापासुन ग्रामपंचायतला ४० लाख ७५ हजार १०० रूपये तर खासगी नळधारकांकडून ४० लाख ३६० हजार ४५० रूपये मिळत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा ज्या प्रमाणे केला जातो त्याच प्रमाणात कर देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे ग्रा. पं. ने दुर्लक्ष केल्याचा आरोप शामराव बोबडे यांनी केला. ग्रा. पं. चे सहा वार्ड आहेत.त्यापैकी वार्ड क्र. ४ व ५ वार्ड वेकोलि वणी कोळसा खाण कामगार वसाहतीचा समावेश आहे. वसाहतीकरिता वेकोलिची पाणी पुरवठा योजना स्वतंत्र व्यवस्था आहे घुग्घुस वार्ड क्र. १, २ , ३, ६ मध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची आहे. वर्धा नदीवरील विहिरीतून (टाकी) पाण्याचा उपसा करणारे ३ पंप आहेत. दोन ते पाणी जलशुध्दीकरण सयंत्रापर्यंत पाणी दोन स्वतंत्र पाइपलाईन टाकण्यात आले. घुग्घुस शहराच्या लोकसंख्येनुसार सदर पाणी पुरवठा योजना १८ लाख ९५ हजार ४० लिटर प्गरज पूर्ण करू शकते. मात्र, १५ वर्षांत ग्रा.पं.ला शक्य झाले नाही, असा आरोप बोबडे यांनी केला आहे.लाखोंचा खर्च सुरूचजीवन प्राधिकरण विभागाने घुग्घुस शहराची लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मागील २० वर्षांत ५ लाख लिटर क्षमतेवरून १२ लाख लिटर केला. शिवाय जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित केली आहे. या प्रकल्पासाठी साहित्य खरेदी व दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतो. पण, पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही.शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, यासाठी जीवन प्राधिकरणकडून दररोज अभ्यास व निरीक्षण सुरू आहे. येत्या १० दिवसांत दररोज पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.-संतोष नुने, प्रभारी सरपंच घुग्घुस

टॅग्स :Waterपाणी