अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:40+5:302021-04-19T04:25:40+5:30
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला ...

अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१६-१७ व २०१८-१९, तसेच २०१९-२० साठी या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान २५ वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव, तसेच जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या पाच वर्षांपर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत अशांनी अर्ज करावे.
२६ एप्रिलला डाक अदालत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात डाक सेवा ही देशाच्या सामाजिक–आर्थिक जीवनाचे अभिन्न अंग आहे आणि वस्तुत: प्रत्येक नागरिकांच्या जीवनाला प्रभावित करतात. डाक विभाग आपल्या ग्राहकांना पूर्ण समाधान प्रदान करण्यासाठी तत्पर आहे. कधीकधी तक्रारीसुद्धा उत्पन्न होतात. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी डाक अदालतचे आयोजन करण्यात येत असते. याकरिता प्रवर अधीक्षक, डाकघर, चांदा विभाग चंद्रपूरच्या वतीने २६ एप्रिलला सोमवारी प्रवर अधीक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूरच्या कार्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने डाक सेवा संबंधात आपल्या तक्रारी दोन प्रतीमध्ये प्रवर अधीक्षक डाकघर चांदा संभाग, चंद्रपूर या पत्त्यावर २० एप्रिलपर्यंत पाठवावे, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक, चंद्रपूर यांनी कळविले आहे.