महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी इनरव्हिलचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:14+5:302021-03-31T04:28:14+5:30
चंद्रपूर : महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी इनरव्हिलचा पुढाकार
चंद्रपूर : महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता यांनी कपड्यापासून थैली व मास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले. कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार हिरावला आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यांना मदत करण्याच्या आनुषंगाने इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात क्लबतर्फे थैली बनविण्यासाठी २० मीटर कापड व मास्क बनविण्यासाठी ५ मीटर कापड देण्यात आला. थैला आणि मास्क तयार झाल्यानंतर क्लबचे सदस्य प्रशिक्षणातील महिलांसोबत बाजारपेठेत जाऊन थैली तसेच मास्कची विक्री केली. साहित्य विकून आलेली रक्कम त्या प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. या रकमेतून त्यांनी कापड खरेदी केला असून, आता हाच व्यवसाय करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमासाठी क्लबच्या डिस्ट्रिक्ट ॲडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, सुमन चड्डा यांसह क्लबच्या सदस्यांनी प्रयत्न केले.