शिक्षक संघटनांमधील राजकारण शिगेलाचंद्रपूर : शिक्षक संघटनांमधील राजकारणाने आता वेगळे वळण घेतले आहे. एका शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने अवैधपणे मिळविलेली निवडश्रेणीची पदोन्नती रद्द करण्याकरिता दुसऱ्या शिक्षक संघटनेने प्रकरण नागपूर येथील म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सादर केले. शिक्षण मंडळाच्या आदेशानंतर के. डी. ठाकरे यांची निवडश्रेणी रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे. म. रा. शिक्षक परिषदेने ठाकरे यांच्या निवडश्रेणीविरोधात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ठाकरे दुसऱ्या शिक्षक संघटेचे जिल्हाध्यक्ष असल्याने या प्रकरणाकडे दोन शिक्षक संघटनातील युद्ध म्हणून पाहिले गेले. (प्रतिनिधी)
अवैध पदोन्नती रद्द
By admin | Updated: August 1, 2016 00:32 IST