वरोरा पालिकेचे १७ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर
By Admin | Updated: March 11, 2016 01:39 IST2016-03-11T01:39:53+5:302016-03-11T01:39:53+5:30
येथील नगर पालिकेचे सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरीता सादर केलेले १७ लाख रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे.

वरोरा पालिकेचे १७ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर
वरोरा : येथील नगर पालिकेचे सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरीता सादर केलेले १७ लाख रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे.
शहराचा विकास साधण्याकरिता व नागरीकांना आरोग्यसह मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, शहरातील मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण, प्रत्येक चौकात हायमास्ट दिव्याची व्यवस्था करणे, अनुसूचित जाती व नवबौद्धांकरीता घरकुल योजना आदी कामाबाबत अंदाज पत्रकात तरतुद करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी बजेट सादर केला. उपाध्यक्षा शकीला बेगम पठाण, नगरसेवक प्रकाश बोरा, पुरुषोत्तम खिरटकर, राजू महाजन, प्रदीप बुराण, शांताराम लोहकरे, छोटु शेख, मुरली डोंगरवार, नगरसेवीका रंजना पुरी, दर्शना सोयाम, दर्शना मडावी, अनजू आडे, प्रतिमा जोगी, उज्वला बोठे, वैशाली तडसे, मंजुषा तिरपुडे आदींनी यावेळी सहकार्य केले. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, अधीक्षक प्रकाश कोटेचा, दिलीप बोरा यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)