शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटली विलोभनीय चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय या विशेष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत. परंतु, त्यांना आकार देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकलाशिक्षकाचा नाविण्यपूर्ण प्रयोग : सुप्त कलागुणांना दिले प्रोत्साहन

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : आनंदवन वरोरा येथील अंध विद्यालयात कार्यरत कला शिक्षक परमानंद तिराणिक यांनी दिव्यांग मुलांनी काढावी आणि चित्रप्रदर्शनी अनुभवावी, अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण प्रयोग केला. या प्रयोगाला या मुलांनी उत्तम प्रतिसाद देऊन देखणी विलोभनीय चित्रे रेखाटल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय झाला आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय या विशेष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत. परंतु, त्यांना आकार देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले कसे चित्र काढतील, कसे चित्रप्रदर्शनी अनुभवतील यासाठी तिराणिक यांनी दिव्यांग मुलांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या सर्व हालचाली टिपल्या. त्यांच्या गुणांना दिशा दिली. विविध प्रयोगाच्या माध्यमातून वासावरून फुल ओळखण्याची कला विद्यार्थ्यांनी अवगत केली. हळूहळू फुलांचा रंग कळू लागला. विविध फळे विद्यार्थ्यांना चाखायला दिली. संत्रा व केळी फळांच्या माध्यमातून फळांचा आकार विद्यार्थ्यांना समजु लागला. संत्रांचा आकार चेंडूसारखा आणि केळीचा आकार विटीसारखा हे उत्तर विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळाले. त्यांना ड्रार्इंग पेपर देण्यात आले. विद्यार्थी त्यावर वेगवेगळ्या आकार काढू लागले. फुले, पक्षी, घरांची चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे ही मुले कॅन्व्हासवर कसे चित्र रेखाटणार, याची उत्सुकता होता. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना नागपूर येथे प्रदर्शनी पाहण्यास नेण्यात आले. दिव्यांग मुलांसाठी आयोजित केलेले भारतातील ते पहिले प्रदर्शन होते. या प्रदर्शनीतूनही मार्गदर्शन मिळाले. चित्रप्रदर्शन पाहताना भिंतीवरती टांगलेल्या चित्रातील अंध मुलगी आपल्याशी संवाद साधू पाहते, हा प्रसंग खूप काही सांगणारा होता. तिराणिक यांचा हा प्रयोग दिव्यांगांना संजिवनी देणारा ठरला आहे. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास कलावंत म्हणून ठसा उमटवू शकतात.दृष्टीहीन विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकीची गरज आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुण ओळखून दिल्यास कला समृद्ध होते. दिव्यांग मुलांच्या विशेष शिक्षणात कलेला अत्यंत महत्त्व असल्याने शिक्षक, पालक व समाजाने त्यांची संवेदनशीलता ओळखण्याची गरज आहे.-परमानंद तिराणिक, कलाशिक्षक

टॅग्स :artकला