गुरुनानक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:05+5:302021-03-18T04:27:05+5:30

बल्लारपूर : येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी पर्वावर रसायनशास्त्र विभागातर्फे नुकतेच आंतरराष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पध्दतीने पार पडले. 'मल्टी डिसीप्लनरी ...

International Webinar at Gurunanak College | गुरुनानक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

गुरुनानक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार

बल्लारपूर : येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी पर्वावर रसायनशास्त्र विभागातर्फे नुकतेच आंतरराष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पध्दतीने पार पडले.

'मल्टी डिसीप्लनरी रिसर्च' हा वेबिनरचा मुख्य विषय होता. या वेबिनारमध्ये जवळपास २६ देशांचे चार हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले.

गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक नागिदंर सिंह सोनी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वेबिनारमध्ये प्रा. ग्लडीन कँप्लिलो (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया), डॉ. ताकीदा मोहम्मद कबीर (फेडरल कॉलेज ऑफ एज्युकेशन, नायजेरिया), प्रा. वासुदेव गुरनुले (कमला नेहरू महा. नागपूर), वेबिनारचे समन्वयक, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद घोडे, प्रा. ज्योत्स्ना खोब्रागडे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. तापमानाच्या वेगावर डॉ. ताकिदा मोहम्मद कबीर यांनी भाष्य केले, तर नॅनोटेक्नॉलॉजी आजच्या काळाची गरज असल्याचे प्रा. गुरनुले यांनी सांगितले. या वेबिनारमध्ये इतर प्राध्यापकांनीसुद्धा आपले विचार मांडले. उपस्थित संशोधनकर्त्यांचा परिचय प्रा. सोनल गेडाम, डॉ. दिनेश देशमुख, डॉ. मनीषा जीवतोडे यांनी करून दिला. नियोजन डॉ . नीलेश जाधव यांनी केले. संचालन डॉ. योगिता बोळखे यांनी केले, तर आभार डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे यांनी केले.

Web Title: International Webinar at Gurunanak College