शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी

By admin | Updated: October 21, 2016 01:06 IST

परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली

काँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे निवेदनभद्रावती : परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत त्वरित द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसने केली आहे. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठविले आहे.हाती आलेले सोयाबिन, कापूस हे नगदी पिके परतीच्या पावसाने खराब होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या दोन वर्षापासून पडणाऱ्या दुष्काळाचा सामना करीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस होऊन भरमसाठ पीक येणार, या आनंदात शेतकरी असताना परतीच्या पावसाने घात केला. तोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. त्यातच अनेकांची मातीची घरे कोसळून नुकसान झाले आहे.दिवाळीसारखा सण तोंडासमोर असताना हातात पैसा नाही. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पडझड झालेल्या मकानधारकांना त्वरित मदत करावी, याकरिता तहसीलदार सचिन कुमावत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेसतर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश गोंडे, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर बोरघरे, वरोरा- भद्रावती विधानसभा युवक काँग्रेस महासचिव शाम चटपल्लीवार, रवी पवार, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सतिश वानखेडे, कार्यकर्ते मनोहर निब्रड, नंदकिशोर पचारे, राजू पाऊनकर, सागर नन्नावरे, सागर पोटे, सुरज रोडे, रुपेश मोहितकर, प्रविण देवगडे, आशिष लांडगे, जुबेर शेख, सलाम शेख, विवेक कामतवार, सागर अंबाघरे, दिनेश नागपूरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)