वृक्षारोपण करून केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST2021-09-27T04:29:32+5:302021-09-27T04:29:32+5:30

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना अभिनव उपक्रम राबवत करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ...

Installation of Shri Ganesha by planting trees | वृक्षारोपण करून केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना

वृक्षारोपण करून केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना अभिनव उपक्रम राबवत करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी कोरोनाच्या आणि शासनाच्या नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी वाजतगाजत मिरवणूक न काढता रोपाची खरेदी करून त्याचे रोपण करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आणि या कार्यक्रमाला चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभने यांना बोलावण्यात आले. त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना पोलीस निरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, कैलास आलाम, मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उसेगावच्या सरपंच प्रियंका पाटील, उपसरपंच निखिल चाफले, मंडळाचे अध्यक्ष अंकित चाफले, उपाध्यक्ष लेतेश सांदेकर, अक्षय चाफले, आस्तिक चांभारे, गणेश कामडी, सुरज दोडके, रामप्रसाद दोडके उपस्थित होते.

260921\img-20210925-wa0213.jpg

वृक्षारोपण करताना पोलीस निरीक्षक मनोजजी गभने

Web Title: Installation of Shri Ganesha by planting trees