पालकमंत्र्याकडून बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेची पाहणी

By Admin | Updated: January 28, 2017 01:04 IST2017-01-28T01:04:45+5:302017-01-28T01:04:45+5:30

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ जानेवारी रोजी चंद्रपुरातील स्व. बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेची पाहणी केली.

Inspector of Baba Amte Memorial Study from Guardian Minister | पालकमंत्र्याकडून बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेची पाहणी

पालकमंत्र्याकडून बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेची पाहणी

चंद्रपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ जानेवारी रोजी चंद्रपुरातील स्व. बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बालपांडे, प्रकाश धारणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्व. बाबा आमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ २०१४ मध्ये प्रकाशित टपाल तिकिटाच्या सादरीकरण समारंभात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी अभ्यासिकेचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. या अभ्यासिकेचे कै. बाबांच्या स्मृतीदिनी म्हणजे ९ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकार्पण करण्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार या आश्वासनाची पूर्तता झाली असून ९ फेब्रुवारी रोजी अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Inspector of Baba Amte Memorial Study from Guardian Minister