आमदारांकडून नियोजित कोविड सेंटर इमारतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:31+5:302021-05-05T04:46:31+5:30

वरोरा शहरात मागील काही दिवसात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील ...

Inspection of Kovid Center building planned by MLAs | आमदारांकडून नियोजित कोविड सेंटर इमारतीची पाहणी

आमदारांकडून नियोजित कोविड सेंटर इमारतीची पाहणी

वरोरा शहरात मागील काही दिवसात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर त्याच परिसरात उपचार व्हावे, याकरिता वरोरा तालुक्यातील माढेळी, टेमुर्डा, शेगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी सोमवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. या केंद्रामध्ये निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाणार असून, एक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नेमण्यात येणार आहे. शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संथगतीने चालू असल्याचे आजच्या पाहणीत आमदार प्रतिभा धानोरकर यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, संवर्ग विकास अधिकारी संजय वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of Kovid Center building planned by MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.