जामनीत आले जखमी अस्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:54+5:30

खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने स्वत:च्या बचावासाठी एका झाडाजवळ आश्रय घेतला. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

Injured bear came into the fire | जामनीत आले जखमी अस्वल

जामनीत आले जखमी अस्वल

googlenewsNext
ठळक मुद्देबघ्यांची उसळली गर्दी : रेस्क्यू करून केले पिंजऱ्यात जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खडसंगीपासून सहा किमी अंतरावरील जामनी (पुनर्वसन) येथे गावालगत गुरुवारी सकाळी ११ वाजता भटकलेल्या अस्वलाने जामनी गावालगत आश्रय घेतला. सदर अस्वल जखमी असून वनविभागाने तिला पिंजºयात जेरबंद केले आहे.
खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने स्वत:च्या बचावासाठी एका झाडाजवळ आश्रय घेतला. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, खडसंगी क्षेत्राचे आर. एच. नागदेवते, वनरक्षक एन. डी. मडावी, वनरक्षक डी.जे. मैद आदी कर्मचाºयांनी अस्वलाला रेस्क्यू करण्यासाठी नेट, पिंजरा लावला. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांना या अस्वलाला पिंजºयात जेरबंद करण्यात यश आले. वैद्यकीय तपासणीकरिता अस्वलाला खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे.

सुब्बईत अस्वलाने दिला पिलांना जन्म
राजुरा तालुक्यातील विरुर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाºया सुब्बई नियत क्षेत्राच्या कक्ष क्रमांक १३७ मध्ये एका अस्वलाने पिल्लांना जन्म दिला. याची माहिती बुधवारीच गावकऱ्यांनी वन विभागाला दिली. मात्र वन अधिकाऱ्यांनी याची अजूनही दखल घेतली नाही. सध्या नागरिक दहशतीत आहेत. सुब्बई येथील इंदिरानगर वस्तीला लागूनच असलेल्या झुडपात अस्वलाने दोन पिलांना जन्म दिला. अस्वल आणि तिचे पिल्ले सुखरुप आहे. मात्र वृत्त लिहिपर्यंत वनविभागाचे अधिकारी अजूनही त्या ठिकाणी आलेले नाही. या अस्वलामुळे नागरिकांना धोका तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Injured bear came into the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.