रामाळा स्वच्छता अभियानात विविध संघटनांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:17+5:302021-03-29T04:16:17+5:30

चंद्रपूर : इको-प्रोतर्फे सुरू असलेल्या रामाळा तलाव स्वच्छता अभियानाच्या १४व्या दिवशी इको-प्रो संस्थेच्या सदस्यांसोबत विविध संस्था-संघटनांच्या युवक व महिला ...

Initiatives of various organizations in Ramala Sanitation Campaign | रामाळा स्वच्छता अभियानात विविध संघटनांचा पुढाकार

रामाळा स्वच्छता अभियानात विविध संघटनांचा पुढाकार

चंद्रपूर : इको-प्रोतर्फे सुरू असलेल्या रामाळा तलाव स्वच्छता अभियानाच्या १४व्या दिवशी इको-प्रो संस्थेच्या सदस्यांसोबत विविध संस्था-संघटनांच्या युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान केले.

इको-प्रोतर्फे रामाळा तलाव संवर्धनाकरिता करण्यात आलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनानंतर १५ मार्चपासून नियमित सकाळी रामाळा तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. रविवारी नांदगाव येथील शिवछत्रपती प्रचारक मंडळाचे युवक, जंगल जरनी या महिला ग्रुपच्या महिला व इको-प्रो महिला मंचच्या महिला सहभागी झाल्या होत्या.

श्रमदान अभियानात तलावातील प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. एक देऊळ ते बगड खिडकीमध्ये रामाळा उद्यान निर्मितीच्या वेळी तयार करण्यात आलेला पर्यटन रस्तासुद्धा स्वच्छता करण्यात येत आहे. दरम्यान, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी रामाळा तलावास भेट देत श्रमदान तसेच तलावातील आवश्यक करावयाच्या कामाबाबत पाहणी केली.

श्रमदानात शिवछत्रपती प्रचारक मंडळ, नांदगाव पोडे मार्गदर्शक बंडू काकडे, दीपक तुरानकर, अध्यक्ष महेंद्र डोये, उपाध्यक्ष नितेश येग्गेवार, प्रदीप भोयर यांच्यासह अनेक नांदगावमधील युवक, जंगल जरनीच्या चित्रा इंगोले, वंदना मून, वैशाली फुलकर, विद्या चित्रीव तर इको-प्रो महिला मंचच्या योजना धोतरे, भारती शिंदे, मोनाली बुरडकर, नीता रामटेके, मनीषा जयस्वाल तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर जामदार, अमर गेही, चांदा पब्लिक स्कूलचे अमर व इको-प्रो सदस्य व नांदगाव मधील युवक सहभागी झाले होते.

Web Title: Initiatives of various organizations in Ramala Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.