सिंदेवाहीत कोविड लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:44+5:302021-03-07T04:24:44+5:30

सिंदेवाही : येथील ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षांवरील आजार असणाऱ्या नागरिकांना कोविड लसीकरणाची मोहीम ४ मार्चपासून सुरू झाली आहे. याचा ...

Initiation of covid vaccination in Sindewahi | सिंदेवाहीत कोविड लसीकरणाला प्रारंभ

सिंदेवाहीत कोविड लसीकरणाला प्रारंभ

सिंदेवाही : येथील ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षांवरील आजार असणाऱ्या नागरिकांना कोविड लसीकरणाची मोहीम ४ मार्चपासून सुरू झाली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व फ्रंटवर्कर अशा एकूण ५८२ कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ४५ वर्षांवरील नागरिक ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींनासुद्धा लसीकरणाचा लाभ घेता येईल, त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर नोंदणीही मोफत असून संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करून लसीकरण केंद्राची निवड करता येईल. त्यासाठी मोबाइल क्रमांक, आधार कार्ड किंवा विहित ओळखपत्र क्रमांक ऑनलाइन नोंदणीच्या वेळी सादर करायचे आहे. ४५ वर्षांवरील काही आजार असणाऱ्या नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Initiation of covid vaccination in Sindewahi