सोयाबीनवर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 1, 2014 23:28 IST2014-09-01T23:28:24+5:302014-09-01T23:28:24+5:30

राजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना, जिवती, पोंभुर्णा व गोंडपिपरी या तालुक्यामध्ये सोयाबीनवर चक्रीभुंगा व स्पोडोप्टेरा अळी या किडीचा प्रादुर्भाव आहे. या किडीचा मादी भुंगा देठावर दोन गोलाकार

Inflorescence of soybeans | सोयाबीनवर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव

चंद्रपूर : राजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना, जिवती, पोंभुर्णा व गोंडपिपरी या तालुक्यामध्ये सोयाबीनवर चक्रीभुंगा व स्पोडोप्टेरा अळी या किडीचा प्रादुर्भाव आहे. या किडीचा मादी भुंगा देठावर दोन गोलाकार चाप देतो व त्यात अंडी घालतो. असा प्रादुर्भाव ग्रस्त भाग सहज लक्षात येतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
याकिडीचे प्रमाण वाढल्यास १० लिटर पाण्यात ट्रायझोफॉस ४० टक्के २५ मिली किंवा अ‍ॅसिफेट ७५ टक्के १५ ग्रॅम मिसळून आलटून पालटून फवारावे अशी विनंती कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.
सध्या राजुरा उपविभागातील तालुक्यात स्पोडोप्टेरा लिटुराचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे स्पोडोप्टेरा लिटुरा (तंबाखुची पाने खाणारी अळी) येण्याची शक्यता आहे. या किडीचा पतंग मजबुत बांध्याचा २५ मि.मी. लांब असून रंगाचे असुन त्यावर नागमोडी पांढऱ्या खुणा असतात.
मागील पंख पांढरे असून कडेला तांबडी झालर असते. शेतकरी या किडीस लष्करी अळी म्हणतात.
सदर किडीला अनुकुल वातावरण निर्माण होताच पतंगाची संख्या वाढलेली आढळली. सोयाबीनचे पानाचे खालच्या बाजुला पुंजक्यात अंडी तसेच अळी आढळून येऊ शकते. याकरिता शेतकऱ्यांनी सतर्क राहून पिकाचे निरीक्षक करावे. सोबतच प्रकाश सापळ्याचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत, या किडीकरिता तयार करण्यात आलेले कामगंध सापळे प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात (हेक्टरी १० याप्रमाणे लावावेत) त्यामध्ये पतंग आकर्षित होतील ते काढून नष्ट करावे. या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी १० अळ्या प्रती लिटर ओळीत आढळल्यास खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी, क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के २० मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोऐट ५ एस.जी. ५ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी विनंती कृषी विभागाने शेतकऱ्यांना (नगर प्रतिनिधी)

Web Title: Inflorescence of soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.