शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

संविधानामुळेच भारत एकसंघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:30 AM

देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत. आज कायद्यावर वादविवाद होणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचे शिक्षण पुस्तकी न होता त्याला व्यावहारिकतेची जोड असायला हवी. भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी रिसर्च असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा तसेच एकदिवसीय राज्यस्तरीय एपीआय मार्गदर्शक कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार विजय भदे, आदिवासी नेते एल. के. मडावी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दिक्षीत, राजेश सोनोने, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, अविनाश जाधव, डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. निरज नगराळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विद्यापीठातील सिनेट सदस्य, बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य, आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक व विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विद्याधर बन्सोडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले.