संविधानामुळेच भारत एकसंघ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:30 IST2018-08-20T00:30:08+5:302018-08-20T00:30:53+5:30
देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत.

संविधानामुळेच भारत एकसंघ!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत. आज कायद्यावर वादविवाद होणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचे शिक्षण पुस्तकी न होता त्याला व्यावहारिकतेची जोड असायला हवी. भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी रिसर्च असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा तसेच एकदिवसीय राज्यस्तरीय एपीआय मार्गदर्शक कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार विजय भदे, आदिवासी नेते एल. के. मडावी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दिक्षीत, राजेश सोनोने, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, अविनाश जाधव, डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. निरज नगराळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विद्यापीठातील सिनेट सदस्य, बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य, आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक व विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विद्याधर बन्सोडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले.